गुटखा खाणाऱ्याला सोनू सूदनं फटकारलं 

आणखी पाहा...!

करोना काळात अनेक कुटुंबीयांसाठी देवदूत ठरलेला अभिनेता सोनू सूद.

सोनू सूद सोशल मीडियावर सक्रीय असतो. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोकांना मदत करत असतो. 

नुकताच सोनूनं एका गुटखा खाणाऱ्याला चांगलंच खडसावलं आहे. 

सोनू चंद्रपूरहून नागपूरला जाताना त्यानं एक व्हिडीओ शेअर केलाय. 

नागपूरला जाताना तो एका चहाच्या टपरीवर कॉफी पिण्यासाठी थांबला. 

सोनूनं गुटखा खाणाऱ्याला समजावलं आणि गुटखा थुंकण्यास सांगितलं. 

व्हिडीओत सोनू त्याला 'गुटखा थुंकून दे आणि यापुढेही खाणं बंद कर', असं सांगताना दिसतोय. 

सोनू सूदबद्दल तुम्हाला काय वाटतं?