सोनम 'या' दिवशी दाखवणार लेकाचा चेहरा?

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर चित्रपटांपेक्षा जास्त आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असते.

अभिनेत्री सतत काही ना काही गोष्टी शेअर करुन सर्वांचं लक्ष वेधत असते.

सोनम कपूर नुकतंच आई बनली आहे.

सोनमने काही महिन्यांपूर्वी गोंडस लेक 'वायू' ला जन्म दिला आहे.

सोनम कपूरच्या मुलाला पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत, परंतु तिने अद्याप वायूचा एकही फोटो शेअर केलेला नाहीय.

अभिनेत्रीने काही फोटो शेअर केले आहेत. मात्र त्यामध्ये तिच्या मुलाचा चेहरा लपवण्यात आला आहे.

सोनमने एका मुलाखतीत वायूचा फोटो कधी शेअर करणार याबाबत खुलासा केला आहे.

सोनम म्हणाली, 'तो मोठा झाल्यानंतर मी फोटो शेअर करेन कदाचित... किंवा जेव्हा तो स्वतः हा निर्णय घेईल'.

सोनमच्या मुलाला पाहण्यासाठी आता चाहत्यांना अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे.