'पंजाबी कुडी' आहे सोनाली कुलकर्णीची आई!
सोनाली कुलकर्णीने आपल्या सौंदर्याने लोकांना अक्षरशः वेड लावलं आहे.
सोनाली कुलकर्णीने सुरुवातीला मॉडेल म्हणून आपली कारकीर्द सुरु केली होती.
त्यांनंतर तिने दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या 'बकुळा नामदेव घोटाळे' चित्रपटातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं होतं.
खाजगी आयुष्यामध्ये सोनाली कुलकर्णी आपल्या आईच्या फारच जवळ आहे.
अनेकांना माहिती नसेल सोनालीची आई ही मूळची पंजाबची आहे.
अभिनेत्रीच्या आईचं नाव सविंदर कुलकर्णी असं आहे.
सोनालीच्या आई कामानिमित्त पंजाब सोडून महाराष्ट्रात आल्या होत्या.
सोनालीचे वडील मनोहर यांच्याशी लग्न करत त्या कायमस्वरुपी महाराष्ट्रातच स्थायिक झाल्या आहेत.
सोनाली कुलकर्णीचे वडील मनोहर कुलकर्णी हे भारतीय सैन्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते.