गानकोकिळा लता मंगेशकर यांनी आपल्या सुमधुर आवाजाने कोट्यावधी लोकांच्या मनावर राज्य केलं
लतादीदी आज या जगात नसल्या तरी त्या आपल्या गाण्यांच्या माध्यमातून आजही लोकांना भुरळ पाडत आहेत.
लता दीदींची गायन कारकिर्द सर्वांनाच माहिती आहे. परंतु फारच कमी लोकांना त्यांच्या लव्हस्टोरीबाबत माहिती आहे.
लतादीदी अविवाहित राहण्यामागे भावंडाची जबाबदारी हे कारण होतंच पण यामागे आणखी एक कारण सांगितलं जातं.
माजी क्रिकेटर आणि क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष राज सिंह यांच्या प्रेमात दीदी होत्या. त्यांना त्या लाडाने मिठू नावाने हाक मारायच्या.
दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला पण राज सिंह यांच्या वडिलांनी या नात्याला नकार दिला. त्यांना सुनसुद्धा राजघराण्यातीलच हवी
होती.
राज सिंह यांनी आई वडिलांच्या शब्दाला मान देत लता दीदींबरोबर लग्न करण्याचा विचार त्यांनी मनातून काढून टाकला.
पहिल्यांदाच प्रेमात पडलेल्या लतादीदींना नकार पचवाव लागला होता. यांनतर त्यांनी कधीच लग्नाचा विचार केला नाही.