सिड-कियारा आधी बॉलिवूडच्या या जोडप्यांनी राजस्थानमध्ये केलंय शाही लग्न!
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीच्या लग्नामुळे सगळ्यांचीच उत्कंठा वाढली आहे.
राजस्थानमधील जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये दोघांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.
आज त्यांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी सगळेच आतुर झाले आहेत.
सिड-कियारा आधी कतरिना आणि विकीने राजस्थानमधील सवाई माधोपूरमध्ये धुमधडाक्यात लग्न केले.
प्रियांका आणि निक जोनास या जोडप्याने जोधपूरच्या प्रसिद्ध उम्मेद भवन पॅलेसमध्ये लग्नगाठ बांधली.
दृश्यम फेम अभिनेत्री श्रिया सरन हिने राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली.
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता नील नितीन मुकेश याने रुक्मिणी हिच्यासोबत शाही लग्न केले होते.
प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन हिने देखील राजस्थानमध्ये थाटात लग्न केले होते.
नुकतंच अभिनेत्री हंसिका मोटवानीने राजस्थानच्या जयपूरमध्ये शाही लग्न केलं आहे.