सिद्धार्थ जाधवने दिली होती 'तुंबाड'साठी ऑडिशन पण... 

राही बर्वे दिग्दर्शित तुंबाड सिनेमानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. सिनेमा माऊथ पल्बिसिटीमुळे लोकांपर्यंत पोहोचला. 

सिनेमातील हस्तरनं प्रेक्षकांना हादरवून सोडलं. पण तुम्हाला माहितीये का? तुंबाडमध्ये अस्तरच्या भूमिकेत अभिनेता सिद्धार्थ जाधव दिसला असता. 

सिद्धार्थनं हस्तरच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती असं सिद्धार्थने एका मुलाखतीत सांगितलं.

सिद्धार्थ म्हणाला, '2003मध्ये मी तुंबाडसाठी ऑडिशन दिली होती'. 

'तेव्हा 'लोचा झाला रे' सिनेमा आला होता. आणी मी शिवाजी पार्कातील समर्थ व्यायाम मंदिरमधील हॉलमध्ये ऑडिशन दिली होती'. 

'राही बर्वेला मी चालून दाखवलं होतं. त्याने मला एक अंडरवेअर दिला आणि माझ्या कंबरेला एक पिशवी बांधली'. 

'राहीने मला त्या अवस्थेत वेगवेगळ्या पद्धतीने चालून दाखवायला सांहितलं. मी जेवढं विचित्र चालता येईल तेवढं चालून दाखवलं'

'मला तेव्हा कळालं नाही की हे काय आहे. मला क्रेझ होती की इंटरनॅशन सिनेमात काम करायला मिळणार'. 

'पण मला तो सिनेमा मिळाला नाही. राहीनं तो सिनेमा वेगळ्या पद्धतीने केला'. 

'आता त्याने हस्तरला VFX देऊन आणखी किळसवाणं आणि भितीदायक बनवलं'. 

'तेव्हा मी तसाच दिसत होतो त्या हस्तरसारखा. तुमच्या दिसण्यावरून लोक वेगवेगळी पात्र निर्माण करतात आणि त्यांना ती कल्पना सुचते', असं सिद्धार्थ म्हणाला. 

सेलिब्रेटी होण्याआधी अक्षय केळकरला होती 'ही' सवय

Heading 3

Click Here