श्रुती हसनचा Bold Look  व्हायरल! बॉयफ्रेंडसह रोमँटिक पोज देतेय अभिनेत्री

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून बॉलिवूडपर्यंत ओळख कमावलेली अभिनेत्री श्रुती हसन सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असते.

श्रुतीच्या लेटेस्ट इन्स्टाग्राम पोस्ट्स खूप व्हायरल झाल्या आहेत.

एका पोस्टमधल्या फोटोजमध्ये श्रुती एकटीच असून, त्यात तिने कधी पाउट करून, तर कधी सिझलिंग पोझेस दिल्या आहेत.

श्रुतीने स्टायलिश ब्लॅक प्रिंटेड शॉर्ट ड्रेस घातला असून, डार्क रेड लिपस्टिक लावली आहे.

फॅन्सना श्रुतीचे हे फोटोज आवडले असून, त्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

श्रुतीने दुसरी पोस्ट बॉयफ्रेंड शंतनू हजारिका याला Birthdayच्या शुभेच्छा देण्यासाठी शेअर केली होती.

त्या पोस्टमध्ये शंतनूचे एकट्याचे, तसंच त्याचे श्रुतीसोबतचे फोटोज आहेत.

रिपोर्टनुसार श्रुतीची यापूर्वी एकदा प्रेमात फसवणूक झाली होती. त्यानंतर ती डिप्रेशनमध्ये गेली होती. ड्रिंक्सही घ्यायला लागली होती, असं तिने सांगितलं होतं.

नंतर तिने स्वतःला सांभाळलं, कामावर फोकस केलं. दरम्यान, शंतनूशी तिची भेट झाली आणि ते एकत्र राहू लागले.

शंतनू आणि श्रुती यांना खूप ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. ती दोघांचे फोटोजही अनेकदा शेअर करत असते.

श्रुती हासन लवकरच सालार या सिनेमात अभिनेता प्रभाससोबत झळकणार आहे.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?