संपूर्ण बॉलीवूडला वेड लावणारी लोकप्रिय गायिका शाल्मली खोलगडे नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे.

शाल्मलीने तिचा बॉयफ्रेण्ड फरहान शेख सोबत लग्नगाठ बांधली आहे.

२२ नोव्हेंबर रोजी राहत्या घरात छोटेखानी पद्धतीने हा सोहळा पार पडला. 

फरहान हा साऊंड इंजिनिअर आहे.

शाल्मली आणि फरहान गेले सहा वर्ष एकमेकांना डेट करत आहेत.

लग्नाच्या दिवशीच त्यांनी साखरपुडाही केला आहे.

शाल्मली आणि फरहान यांना नोंदणीकृत पद्धतीने विवाह करण्याची इच्छा होती.

मात्र घरच्यांच्या आग्रहाखातर घरातच लग्नाच्या विधी पार पाडल्या.

शाल्मलीने 'बलम पिचकारी', 'दारू देसी', 'बेशर्मी की हाईट', 'बेबी को बेस पसंद हैं', 'शनिवार राती', 'लत लग गई' यांसारख्या हिट गाण्यांना आपला आवाज दिला आहे. 

शिवाय तिने अनेक हिंदी आणि मराठी रिअॅलिटी शोसाठी परीक्षक म्हणूनही काम केलं आहे.