अभिनेता शाहरुख खान हा मुस्लिम आहे. तर गौरी खान ही हिंदू.
शाहरुखच्या घरी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही सण साजरे होतात.
शाहरुख गौरीला तिन मुलं आहेत. आर्यन, सुहाना आणि अब्राहम.
घरात धर्मावरून तसं वातावरण नसलं तरी आर्यन खान कोणता धर्म मानतो असा प्रश्न गौरीला एका मुलाखतीत विचारण्यात आलं.
प्रश्नाचं उत्तर देत गौरी म्हणाली, 'आर्यन त्याच्या वडिलांच्या अतिशय जवळ आहे आणि तो त्यांना फॉलो करतो'.
'आर्यन स्वत:ला मुस्लिम मानतो', असं गौरीनं सांगितलं.
तसंच गौरी लग्नानंतर कनवर्ट का झाली नाही? याचंही तिनं उत्तर दिलं.
गौरी म्हणाली, 'माझं शाहरुखवर मनापासून प्रेम आहे. मी त्याचा आदर करते'.
'पण मी त्याचा धर्मही पाळावा असा त्याचा अर्थ होत नाही'.
'हीच गोष्ट शाहरुखलाही लागू होते', असं गौरी म्हणाली.