2 चमचे 1 एक ताट; लग्नानंतर अशी होती शाहिदच्या घराची अवस्था 

 अभिनेता शाहिद कपूरचं आजवर अनेक अभिनेत्रींबरोबर नाव जोडलं गेलं. पण त्यानं 2015मध्ये मीरा राजपूतबरोबर लग्न केलं. 

शाहिद आणि मीरा यांच्या लग्नाला 8 वर्ष पूर्ण झालीत. दोघांना 2 मुलं आहेत. 

आज जरी शाहिद करोडोच्या संपतीचा मालक असला तरी लग्न झालं त्यावेळस त्याच्या घरी फक्त 2 चमचे आणि 1 ताट होतं. 

शाहिदनं एका मुलाखतीत मीरा लग्न करून घरी आली तेव्हाचा किस्सा शेअर केलाय. 

शाहिद म्हणाला, "मीरा जेव्हा लग्न करून आली तेव्हा माझ्या घरात फक्त 2 चमचे आणि 1 ताट  एवढ्याच वस्तू होत्या". 

"पण माझ्या घरातील ही परिस्थिती पाहिल्यानंतरही मीरा मला काहीच बोलली नाही". 

"लग्नाआधी मी एकटाच राहायचो त्यामुळे मला या गोष्टींची कधीच गरज भासली नाही. पण मीरा आल्यानंतर हे सगळं बदललं". 

"मीराने मला विचारलं की आपल्याकडे एकही डायनिंग सेट नाही. कधी पाहुणे आले तर त्यांना आपण कशामध्ये जेवण द्यायचं".

"त्यानंतर आम्ही सगळं ऑर्डर केलं. दोघांनी घराच्या इंटेरियरवर काम केलं. तिला हवं होतं तसं आम्ही आमचं घर सजवलं". 

शाहिद आणि मीरा यांच्या लग्नाला 8 जुलै रोजी 8 वर्ष पूर्ण होतील. अभिनेत्यानं नुकतंच 'फर्जी' या वेब सीरिजमधून OTTवर पदार्पण केलं आहे. 

सारा अली खानच्या घराचे Inside फोटो

Heading 3

Click Here