'या' राजकीय पक्षासाठी काम करते सायली संजीव!

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सायली संजीव.

सायलीने मराठी मालिका, चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आहेत.

छोट्या पडद्यानंतर सायलीने मोठ्या पडद्यावर देखील अधिराज्य गाजवलं.

कलाक्षेत्राबरोबरच सायलीला राजकीय क्षेत्राचीही आवड आहे.

सायली संजीव महाराष्ट्रातील एका मोठ्या राजकीय पक्षामध्ये सक्रिय आहे.

सायली  राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी काम करते.

तिची काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्तीही करण्यात आली होती.

'संबंधित पक्षाची विचारधारा पुढे नेण्यासाठी तुम्हाला विचार मांडावे लागतात.' अशी भूमिका तिने व्यक्त केली आहे.

सायली संजीव स्पष्टवक्ती आहे. ती तिचं मत ठामपणे मांडायला मागेपुढे पाहत नाही.