'तुच नवरी...' समृद्धीचं रूप पाहून चाहत्यांची रिऍक्शन!
अभिनेत्री समृद्धी केळकरच्या घरी लगीनघाई सुरु आहे.
नुकतंच तिच्या मोठ्या बहिणीचं लग्न पार पडलं.
बहिणीच्या लग्नात समृद्धी सजली होती.
हातात हिरव्या बांगड्या, नाकात नथ असा मराठमोळा लूक समृद्धीने केला होता.
समृद्धीने बहिणीच्या लग्नातील फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते.
मेहंदी असो वा संगीत तिचे प्रत्येक लूक सोशल मीडियावर व्हायरल झाले.
तिच्या मनमोहक रूपावर चाहते घायाळ झाले आहेत.
समृद्धीच्या या फोटोंवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत.
'तूच नवरी शोभतेयस', 'तुझंच लग्न होतं असं वाटतंय' अशा कमेंट त्यांनी केल्या आहेत.