VIDEO: अन एयरपोर्टवरच सलमानला मिठी मारली!

सलमान खानला त्याच्या दिलखुलास व्यक्तिमत्वासाठी ओळखलं जातं.

सलमान खानचं मन खूप मोठं आहे असं अनुभव घेणारे अनेकजण म्हणत असतात.

तसेच सलमान खान आपल्या चाहत्यांना नेहमीच आदराने आणि प्रेमाने हॅन्डल करत असतो. 

 बॉलिवूडचा भाईजान आपल्या चिमुकल्या चाहत्यांवर तर जीव ओवाळून टाकतो.

सलमान खानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून प्रचंड कौतुक होत आहे.

एरपोर्टवरुन येत असताना सलमानला पाहण्यासाठी गर्दी झाली होती. 

अशातच चालता-चालता सलमानचं लक्ष एका छोट्या फॅनकडे गेलं. 

त्याने त्या मुलाला बोलावलं आणि मुलाने येताच भाईजानला मिठी मारली. (व्हिडीओ क्रेडिट-विरल भयानी)

हा व्हिडीओ सध्या प्रचंड चर्चेत आहे. सलमानचं सर्वत्र कौतुकही होत आहे.