सलमानसाठी 2022 खास, भाईजानचे हे चित्रपट आहेत रांगेत

या यादीत पहिला नंबर आहे अली अब्बास झफर दिग्दर्शित 'टायगर थ्री'चा...

 यशराज फिल्म्सच्या टायगर सीरिजमधल्या या सिनेमामध्ये सलमान आणि कतरिना यांची जोडी आहे.

2022च्या सुरुवातीला हा सिनेमा प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

फरहाद सामजी यांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात सलमान खान आणि पूजा हेगडे प्रमुख भूमिकेत आहेत.

2014मध्ये रिलीज झालेल्या किक या सिनेमाचा दुसरा भाग असलेला किक टू हा सिनेमा येत असून, त्यात सलमान नकारात्मक भूमिकेत दिसेल. 

 साजिद नाडियादवालाचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाच्या पहिल्या भागाप्रमाणेच या भागातही सलमानसोबत जॅकलीन फर्नांडिझ दिसणार आहे. 

एस. एस. राजमौली यांच्या RRR सिनेमाच्या प्रमोशनवेळी सलमानने आपल्या बजरंगी भाईजान या सुपरहिट सिनेमाच्या सिक्वेलची घोषणा केली.

राजमौली यांचे वडील आणि ख्यातनाम तेलुगू पटकथाकार के. व्ही. विजयेंद्रप्रसाद या सिनेमाची पटकथा लिहिण्याची शक्यता आहे.

2022मध्ये सलमान खान बॉलिवूडमधल्या अन्य दोन सुपरस्टार खान मंडळींसोबत सिनेमात दिसणार आहे.

आमीर खानच्या लालसिंग चढ्ढा या सिनेमात आणि शाहरुख खान अभिनित पठाण या सिनेमात सलमान खानचा गेस्ट अपीअरन्स असेल.