कोण आहे सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली?

 बॉलिवूड अभिनेत्री सोमी अलीसह सलमान अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होता.

सोमी अलीने आता सलमान खानवर गंभीर आरोप केले आहेत.

सोमी अली ही सलमान खानच्या सुरुवातीच्या मैत्रिणींपैकी एक होती.

दोघांनी 1991 मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली.

त्यावेळी दोघांचेही करिअर नुकतेच सुरू झाले होते आणि सलमानही मोठा स्टार नव्हता.

या दोघांचे नाते 1991 मध्ये सुरू झाले आणि 1998 पर्यंत टिकले.

दोघांच्या ब्रेकअप नंतर सोमी अलीचे करिअरही चांगले चालले नाही, त्यामुळे ती फ्लोरिडाला परतली.

सोमी अलीने सलमानबरोबरचा जुना फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करत पोस्ट लिहिली होती.

सोमीने या पोस्टमध्ये तिने सलमानवर गंभीर आरोप केले होते.त्यामुळे तिचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.