वाढदिवस पार्टीत सलमानसह जेनेलियाचा धमाकेदार डान्स!

बॉलिवूडचा 'दबंग' सलमान खानचा 56वा वाढदिवस नुकताच साजरा झाला.

सलमानच्या पनवेलच्या फार्महाउसवर वाढदिवसानिमित्त सेलिब्रेशन झालं.

या वाढदिवस पार्टीत अनेक दिग्गज स्टार्स सहभागी झाले होते.

बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया डिसूझाने या पार्टीत सलमानसह डान्स केला.

त्या दोघांच्या जबरदस्त डान्सचा व्हिडिओ जेनेलियाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

जेनेलिया आणि सलमान एका इंग्लिश गाण्यावर थिरकताना दिसत आहेत

जेनेलिया आणि सलमान या दोघांनीही सारख्याच रंगाचा टी-शर्ट घातलेला दिसत आहे. 

हा व्हिडिओ शेअर करून जेनेलियाने सलमानला शुभेच्छा दिल्या आहेत.

मोठं मन असलेली व्यक्ती, असं संबोधून तिने त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 

सोशल मीडियावर जेनेलियाचा हा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.