2 मुलांचा बाप असणाऱ्या धनुषसोबत लग्न करणार साऊथ अभिनेत्री? 

आणखी पाहा...!

साऊथ सुपरस्टार धनुष गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. 

धनुषने सुपरस्टार रजनीकांत यांची लेक ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेत सर्वांनाच धक्का दिला होता. 

दरम्यान आता दोन मुलांचा बाप असणाऱ्या धनुषच्या दुसऱ्या लग्नाच्या बातम्यांनी जोर धरला आहे. 

धनुषचं प्रसिद्ध साऊथ अभिनेत्री मीनासोबत नाव जोडलं जात आहे. 

मीना आणि धनुषमध्ये काहीतरी सुरु असल्याचं म्हटलं जात आहे. 

इतकंच नव्हे तर हे दोघे लग्नगाठ बांधणार असल्याचीही चर्चा आहे. 

मात्र यावर मौन सोडत मीना यांनी केवळ अफवा असल्याचं म्हटलं आहे. 

मी माझ्या पतीला गमावल्याचं दुःख अजून विसरु शकले नाही. आणि ही अफवा नेमकी कुठून आली समजत नसल्याचं त्यांनी म्हटलंय. 

गेल्यावर्षी मीना यांच्या पतीचं लंग इन्फेक्शनने निधन झालं होतं. मीना यांना एक मुलगीसुद्धा आहे.