'ये हैं मोहब्बतें'तली रूही मोठी झालीय!

टीव्ही सीरियल्स, सिनेमांमधले मोठे कलावंत प्रसिद्ध होतात, तशीच लहान कलाकारांनाही ओळख मिळते. 

'ये हैं मोहब्बतें'मधल्या छोट्या रूहीने अशीच लोकप्रियता मिळवली होती

रुहानिका धवनने ही भूमिका साकारून निरागसतेने मनं जिंकून घेतली होती.

ती लहानगी रुहानिका आता मोठी झाली आहे.

रुहानिकाने ऑफिशियल इन्स्टाग्राम हँडलवर आपले फोटोज शेअर केले असून, ते व्हायरल होत आहेत.

ब्लॅक टॉप आणि डेनिममध्ये रुहानिका एकदम स्टायलिश दिसत आहे.

'छोटा पॅकेट, बडा धमाका' अशी कमेंट तिच्या एका व्हिडिओवर फॅनने केली आहे. 


'गॉर्जस,' 'सो प्रेटी,' अशा विविध कमेंट्स फॅन्सनी तिच्या फोटोवर केल्या आहेत. 

 'श्रीमती कौशिक की पाँच बहुएँ'पासून तिने सुरुवात केली. तिच्या रूही, पिहू या भूमिका लोकप्रिय झाल्या. 

जय हो, घायल या फिल्म्समध्येही ती दिसली होती. अनेक पुरस्कारही तिला मिळाले आहेत.