अभिनेता राम चरण बाबा झाला आहे.
पत्नी उपासनानं मुलीला जन्म दिला. दोघांच्या घरी लक्ष्मी आली.
अभिनेते चिरंजीवी देखील आजोबा झाल्याचा आनंद साजरा करत आहेत.
लग्नाच्या 11 वर्षांनी राम चरण-उपासना आई - बाबा झालेत.
दोघांनी इतक्या उशिरा आई-वडील होण्याचा निर्णय का घेतला? याचं उत्तर समोर आलंय.
प्रेग्नंसी दरम्यान एका मुलाखतीत बोलताना उपसाना म्हणाली, "मी खूप खुश आहे. आमच्या पहिल्या बाळाचं स्वागत करण्यासाठी खूप उत्सुक आहे".
"मला जेव्हा आई व्हावसं वाटलं तेव्हा मी आई होण्याचा निर्णय घेतला या गोष्टीवर मी खूप खुश आहे".
"समाजाला वाटत म्हणून मी आई होण्याचा निर्णय घेतला नाही".
"आताची वेळ माझ्यासाठी आणि रामसाठी सगळ्यात चांगली वेळ आहे. आम्ही दोघेही अत्यंत खुश आहोत".
"आम्ही आता आर्थिकदृष्ट्या सक्षम आहोत. बाळाचं भविष्य सेफ करू शकतो".
"आपल्या बाळाची देखभाल करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत".