शाहिद कपूरने रितेशसोबत मराठी गाण्यावर धरला ठेका!

आपल्या दमदार अभिनयामुळे लोकांच्या मनात घर करणारा अभिनेता म्हणजे रितेश देशमुख.

सध्या तो आणि जेनेलिया त्यांचा आगामी चित्रपट 'वेड' मुळे चर्चेत आहे.

रितेश आणि जेनेलिया सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत.

रितेश देशमुखचा 'वेड' प्रमोशनदरम्यानचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

 रितेशने  त्याच्या 'वेड लावलंय' या गाण्यावर शाहिद कपूरसोबत ठेका धरला आहे.

रितेश आणि शाहिदचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.

 'वेड लावलंय' या मूळ गाण्यात रितेशसोबत सलमान खान दिसणार आहे.

रितेश आणि जिनिलियाचा 'वेड' हा चित्रपट येत्या ३० डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

 'वेड' या चित्रपटातून जिनिलिया मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.