रेणुका-आशुतोषच्या प्रेमाची 22 वर्षे!

भारतीय चित्रपटसृष्टीतील आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे हे जोडपं चांगलंच लोकप्रिय आहे.

रेणुका-आशुतोष या दोघांकडे आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. 

दोघांच्या लग्नाला आज तब्बल 22 वर्ष पूर्ण झाली आहेत. 

रेणुका यांनी आपल्या जुन्या फोटोंचा एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. 

दोघांनी 2000 साली एकमेकांशी लग्नगाठ बांधली होती. 

या दोघांचं लग्न महिनाभरसुद्धा टिकणार नाही असं त्यांच्या कुटुंबाला वाटायचं. 

कारण दोघांची संस्कृती, कौटुंबिक पार्श्वभूमी पूर्णपणे वेगळी होती. 

 रेणुका महाराष्ट्रीयन आहे. तर आशुतोष राणा मध्य प्रदेशचा रहिवासी आहे. 

आशुतोष आधी रेणुका यांचा विवाह मराठी रंगभूमीवरचे प्रसिद्ध  लेखक आणि दिग्दर्शक विजय केंकरे यांच्याशी झाला होता.