68 वर्षांच्या रेखाचा क्युट बार्बी लूक!
बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री म्हणजे रेखा.
रेखा आज 68 वर्षांची असली तरी तिचं सौंदर्य एखाद्या तरुणीला लाजवेल असंच आहे.
रेखाची एक झलक पाहण्यासाठी चाहते अजूनही आतुर असतात.
नुकतंच रेखाचे AI ने केलेले बार्बी डॉल्सच्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
यामध्ये अभिनेत्री मूळ बार्बी डॉलपेक्षा जास्त सुंदर दिसत आहे.
बार्बी डॉलच्या रूपात ती रेखा खूपच सुंदर दिसत असल्याचं चाहते म्हणत आहेत.
या अभिनेत्रीने बार्बी डॉल स्टाईलमध्ये कोणतेही फोटोशूट केलेले नाही, तर हे फोटो AI ने तयार केले आहेत.
रेखा चित्रपटांपासून दूर असली तरी ती टीव्ही रिअॅलिटी शो, इव्हेंट्स आणि पार्ट्यांमध्ये नक्कीच हजेरी लावते.
रेखाचा हा बार्बी डॉल लूक व्हायरल होत आहे.