कतरिना कैफ ते सनी लिओनी... या अभिनेत्रींची खरी नावं आहेत वेगळीच!

बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्यांनी चित्रपटसृष्टीत येण्याआधी नावं बदलली. या ट्रेंडला अभिनेत्रीही अपवाद नाहीत.

काही अभिनेत्रींनी नाव-आडनाव कठीण असल्याने बदललं, तर काही जणींनी ज्योतिषाच्या आधारावर बदल केला. अशा काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊ या.

कतरिना कैफचं मूळ नाव कॅटरिना टरकोटे असं आहे. लंडनमध्ये वाढलेल्या कतरिनाने भारतीय प्रेक्षकांना सहज समजावं म्हणून आईऐवजी वडिलांचं आडनाव लावलं.

शिल्पा शेट्टीचं नाव तिच्या आई-वडिलांनी अश्विनी असं ठेवलं होतं. न्यूमरॉलॉजीच्या आधारावर ते बदलून शिल्पा असं करण्यात आलं.

प्रीतमसिंह झिंटा हे कोणा अभिनेत्याचं नव्हे, तर डिम्पल गर्ल प्रीती झिंटाचं नाव आहे. फिल्ममध्ये येण्यापूर्वी तिने मूळ नाव बदललं.

सनी लिओनीचं मूळ नाव करनजीत वोहरा असं आहे. सनी लिओनी हे नाव तिला प्रोफेशनल लाइफमुळे मिळालं.

बोल्डनेससाठी ओळखली जाणारी ग्लॅमरस अभिनेत्री मल्लिका शेरावतचं मूळ नाव रीमा लांबा असं आहे.

आपल्या अभिनयकौशल्यामुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री तब्बूचं मूळ नाव तबस्सुम फातिमा हाशमी असं आहे.

'तेरे नाम'मधून डेब्यू करणारी अभिनेत्री म्हणजे भूमिका चावला; पण फिल्मी दुनियेत येण्यापूर्वीचं तिचं नाव रचना चावला असं होतं.

'बाहुबली' फेम प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शेट्टीचं नाव स्वीटी शेट्टी असं आहे.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?