नऊवारी साडी,नाकात नथ रश्मिका मंदानाची धमाकेदार लावणी!

आणखी पाहा...!

साऊथ सुंदरी रश्मिका मंदाना सध्या चांगलीच चर्चेत आहे. 

अभिनेत्रीला नॅशनल क्रशदेखील म्हटलं जातं. 

रश्मिकाने काही दिवसांपूर्वी 'गुडबाय' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आहे. 

लवकरच ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'मिशन मजनू'मध्ये झळकणार आहे. 

दरम्यान रश्मिकाने मराठीतील झी गौरव या पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली होती. 

या मंचावर अभिनेत्रीने चक्क मराठमोळी लावणी सादर करत सर्वांनाच वेड लावलं आहे. 

अमृताच्या 'चंद्रा' गाण्यावर रश्मिकाने ठेका धरला होता. 

नऊवारी साडी, नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर लावत रश्मिका अस्सल मराठमोळी स्त्री शोभत होती. 

रश्मिकाने आपल्या लावणीने सर्वांनाच घायाळ केलं आहे.