रणवीर सिंहचे आश्चर्यचकित करणारे भन्नाट अवतार

रणवीर सिंहच्या मंडे मोटिव्हेशन पोस्ट्स वर्क-डे ब्लूज नक्की दूर करतात. 

'रॉकी और रानी की प्रेमकहानी' या सिनेमावर सध्या तो काम करतो आहे.

करण जोहर दिग्दर्शित करत असलेल्या या सिनेमात आलिया भट्ट, धर्मेंद्र, शबाना आझमी, जया बच्चनही आहेत. रणवीरसिंहचं लेटेस्ट ट्रान्स्फॉर्मेशन या सिनेमातल्या रोलसाठी असावं.

कबीर खानच्या '83'मध्येही रणवीरसिंह असून, तो 24 डिसेंबरला रिलीज होणार आहे. त्याची पत्नी दीपिका पादूकोणही त्यात आहे.

रोहित शेट्टीच्या सूर्यवंशी या कॉप-ड्रामा प्रकारच्या सिनेमातली त्याची छोटीशी भूमिकाही चुकवण्यासारखी नाही. 

'बाजीराव-मस्तानी'मध्ये रणवीरसिंहने साकारलेली बाजीरावांची भूमिका आठवतेय? त्यात त्याला मिशा अगदी छान दिसल्या होत्या.

दिल धडकने दो'मधला त्याचा 'बॉय नेक्स्ट डोअर' अवतार अनेकांच्या हृदयाची धडधड वाढवून गेला होता.

'खलीबली' गाणं आठवतंय? रणवीरच्या अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेवर ते चित्रित झालं होतं. 

'गली बॉय'मध्ये रणवीरने रस्टी लूक साकारला होता

'जयेशभाई जोरदार'ची भूमिकाही त्याच्या नावावर आहे. मिशा त्याला अनुरूप वाटतात. तुम्हाला काय वाटतं?