एका अपघातामुळे रंजनाने गमावलं करिअर आणि प्रेम!
मराठीतील 70-80 च्या दशकातील गाजलेल्या अभिनेत्री म्हणजे रंजना देशमुख होय.
आपल्या अप्रतिम अभिनयाने आणि सौंदर्याने त्यांनी प्रेक्षकांना भुरळ पाडली होती.
फारच कमी वयात त्यांचं निधन झालं होतं. परंतु तरीही त्यांनी अफाट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रंजना आणि अशोक सराफ यांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम होतं. इतकंच नव्हे तर ते लग्नसुद्धा करणार होते.
मात्र रंजना यांच्या कार अपघाताने हे नातं संपुष्ठात आलं होतं.
'झुंजार'या सिनेमाच्या शूटिंगसाठी बेंगलोरला जात असताना रंजना यांच्या कारला मोठा अपघात झाला होता.
या अपघातात त्यांचे दोन्ही पाय खराब झाले होते. त्यांनतर त्या तब्बल 14 वर्षे व्हीलचेअरवर होत्या.
त्या अपघाताने रंजनापासून करिअर आणि प्रेम दोन्ही तिच्यापासून दुरावले होते.
पुढे वयाच्या 45 व्या वर्षी अंथरुणाला खिळलेल्या रंजनांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं.