37 वर्षांनी दीपिका चिखलियांनी पुन्हा घेतलं सीतेचं रूप!

रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेत सीतेची भूमिका दीपिका चिखलिया यांनी साकारली होती.

एवढ्या वर्षानंतर आजही त्या कायम चर्चेत असतात.

दीपिका चिखलिया सोशल मीडियावर सुद्धा प्रचंड सक्रिय असतात.

रामायण संपून आज 37 वर्ष उलटली तरीही दीपिका आजही चाहत्यांमध्ये लोकप्रिय असतात.

आता आज एवढ्या वर्षानंतर त्यांनी पुन्हा सीता मातेचं रूप घेतलं आहे.

दीपिका यांनी त्यांच्या सीतेच्या रूपातील काही व्हिडीओ शेअर केले आहेत.

या व्हिडिओमध्ये त्या भगवी साडी धारण करून श्रीरामांची पूजा करताना दिसत आहेत.

विशेष म्हणजे ही तशीच साडी आहे जी त्यांनी रामायण मालिकेच्या लव कुश कांड च्या शुटिंगवेळी नेसली होती.

दीपिका चिखलीया यांचं हे सीतेचं रूप पाहून चाहते भारावले आहेत.