आई रुग्णालयात अन् राखीचं दुसरं लग्न

ड्रामा क्वीन राखी सावंतने लग्न केल्याची बातमी समोर आली आहे.

राखीने तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीसोबत लग्न केलं आहे. 

राखी आणि आदिलचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

आदिल आणि राखी गळ्यात वरमाला घालून फोटोमध्ये पोझ देत आहेत. 

दोघांच्या हातामध्ये मॅरेज सर्टिफिकेट दिसून येत आहे.

एका फोटोत राखी मॅरेज सर्टिफिकेटवर सही करतानाही दिसत आहे. 

एकीकडे राखीची आई रुग्णालयात आणि दुसरीकडे तिनं लग्न केलं आहे. 

राखीच्या लग्नाची बातमी समोर येताच तिचे चाहते आनंदी आहेत. 

राखीने किंवा आदिने अद्याप त्यांच्या लग्नाविषयी अधिकृत माहिती दिलेली नाहीये.