बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांचा जन्म 29 डिसेंबर 1942 रोजी अमृतसर येथे झाला.

राजेश खन्ना हे त्या व्यक्तीचे नाव आहे, ज्यांनी संपूर्ण पिढीला चित्रपटातून रोमान्स करायला शिकवले. 

 राजेश खन्ना यांनी 18 जुलै 2012 रोजी या जगाचा कायमचा निरोप घेतला. 

राजेश खन्ना यांचं स्टारडम निर्विवाद होतं. लोक त्यांना रक्ताने पत्रं लिहायचे.

राजेश खन्ना यांना लोक प्रेमानं काका म्हणायचे.

राजेश खन्नांना हिंदी सिनेमात सगळ्यांत पहिल्यांदा सुपरस्टारचा किताब मिळाला.

राजेश खन्ना यांचा विवाह मार्च 1973 साली डिंपल कपाडिया यांच्याशी झाला.

राजेश खन्ना यांच्या कारकिर्दीची सुरुवात 'आखिरी खत', 'बहारों के सपने' आणि 'राज' अशा चित्रपटांनी झाली. 

'कटी पतंग', 'अमर प्रेम' 'अपना देश', 'आपकी कसम', 'नमक हराम', 'फिर वही रात', 'अगर तुम ना होते', 'आवाज', 'प्रेम नगर', 'अवतार', 'आनंद', 'हम दोनों' अशा चित्रपटांनी आजही चित्रपट रसिकांना मोहिनी घातली आहे.

1990 च्या दशकात मात्र राजेश खन्ना यांनी चित्रपटसृष्टीला रामराम केला आणि राजकारणात प्रवेश केला.

राजेश खन्ना यांचा 'रियासत' हा शेवटचा चित्रपट होता.