सरोगसीद्वारे बाळ झाल्याचं प्रियांका चोप्रा-निक जोनासने नुकतंच जाहीर केलं आहे
याआधीही अनेक सेलेब्रिटीजनी बाळासाठी सरोगसी, IVF चा आधार घेतला आहे.
2020 मध्ये शिल्पा शेट्टीची दुसरी मुलगी समिशा हिचा जन्म सरोगसीद्वारे झाला.
शाहरूख-गौरी खानचा धाकटा मुलगा अबराम याचा जन्म 2013मध्ये सरोगसीद्वारे झाला
सीमा-सोहेल खानचा दुसरा मुलगा योहानचा जन्मही जून 2011मध्ये सरोगसीने झाला आहे
करण जोहर फेब्रुवारी 2017मध्ये सरोगसीने यश-रूही या ट्विन्सचा बाबा झाला.
जून 2016मध्ये सरोगसीच्या माध्यमातून लक्ष्यला जन्म देऊन तुषार कपूर सिंगल पॅरेंट बनला
एकता कपूरही सिंगल मदर आहे. तिने जानेवारी 2019मध्ये रवी या मुलाला सरोगसीद्वारे जन्म दिला
सनी लिओनी-डॅनियल वेबर यांनी 2018मध्ये सरोगसीद्वारे ट्विन्सना जन्म दिला
श्रेयस तळपदे-दीप्ती यांना मे 2018मध्ये सरोगसीने आद्या ही मुलगी झाली.
लिसा रे-जेसॉन देहनी यांना 2018मध्ये सुफी-सोहेल या जुळ्या मुली झाल्या.
फराह खान 43व्या वर्षी 2008मध्ये सरोगसीद्वारे Triplets ची आई झाली.
आमीर खान-किरण रावला 2011 साली IVF द्वारे आझाद हा मुलगा झाला.