प्रियांकाने पतीसोबत ऑटो रिक्षातच दिल्या अशा पोज!

ग्लोबल सुपरस्टार प्रियांका चोप्रा सध्या तिच्या कुटुंबासह भारत दौऱ्यावर आली आहे.

 अलीकडेच प्रियांका चोप्रा पती निक जोनाससह नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती.

प्रियांका चोप्राने सोशल मीडियावर तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये प्रियांका चोप्रा तिचा नवरा निक जोनाससोबत ऑटो रिक्षामध्ये पोज देताना दिसत आहे.

या फोटोंमध्ये प्रियांका चोप्रा आणि निक जोनासची जोडी कमाल दिसत आहे.

इतकेच नाही तर या फोटोमध्ये प्रियांका चोप्रा आपल्या स्टायलिश लूकने सर्वांची मनं जिंकत आहे.

नीता अंबानी कल्चरल सेंटरच्या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचे अनेक फोटो समोर आले होते.

सध्या प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचे हे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

प्रियांका चोप्रा आणि निकच्या या फोटोंवर चाहते प्रचंड लाइक आणि कमेंट करत आहेत.