सरोगसीद्वारे आई होण्याविषयी प्रियांका चोप्राचा खुलासा!

 अभिनेत्री प्रियांका चोप्राने आजवर अनेक दमदार भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

प्रियांका गेल्या वर्षात एका गोंडस मुलीची आई झाली.  या मुलीचा जन्म सरोगसीद्वारे झाला आहे.

अनेकांनी तिचं अभिनंदन केलं तर काहींनी तिच्यावर टीका देखील केली.

प्रियांकाने अलीकडेच पती निक जोनासचं वय आणि सरोगसीद्वारे आई झाल्याने होणाऱ्या टीकेला उत्तर दिलं.

प्रियंकाने यावेळी 'काही वैद्यकीय कारणांमुळे मी आई होऊ शकत नव्हते. त्यामुळे सरोगसी हाच पर्याय होता.' असा खुलासा केला आहे.

ट्रोलर्सबद्दल बोलताना ती म्हणाली, 'तुम्ही मला ओळखत नाही, मी कोणत्या वेदना सहन केल्या हे तुम्हाला माहीत नाही.'

तसेच कोणी जेव्हा माझ्या मुलीबद्दल वाईट बोलतं तेव्हा खूप त्रास होतो.' असंही ती म्हणाली.

'माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा होता. मी खूप भाग्यवान आहे की मला सरोगसीद्वारे आई होता आलं.' असं प्रियांका म्हणाली.

प्रियांकाच्या या वक्तव्याची आता सगळीकडे चर्चा होत आहे.