बेस्ट फ्रेंड ते सहकलाकार! सई-प्रियाची गोड मैत्री;  Priya ने मैत्रिणीसाठी केली खास पोस्ट

अभिनेत्री सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांची मैत्री खास आहे


या दोन्ही अभिनेत्री एकमेकींसाठी सोशल मीडियावर पोस्ट करत असतात

दोघींचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत


हे फोटो शेअर करताना प्रिया आणि सई एकमेकींचं कौतुक करताना थकत नाही

दोघीही मराठीतील आघाडीच्या अभिनेत्री आहेत. त्यांच्यातील ही गोड मैत्री अनेकांसाठी आदर्श आहे

31 डिसेंबर रोजी प्रिया बापट हिने सई ताम्हणकरचा फोटो स्टोरीमध्ये पोस्ट करत 'I love this Girl' अशी कॅप्शन दिली आहे. सईने देखील हा फोटो रिपोस्ट केला आहे

सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांनी 'वजनदार' आणि 'टाइम प्लीज' या सिनेमात एकत्र काम केलं आहे

या दोन्ही सिनेमात सई-प्रियाचा अभिनय आणि त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली आहे

सई आणि प्रियाने हिंदी अभिनय क्षेत्रातही त्यांच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. त्यांच्या सिनेमा-वेबसीरिजसाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात

सई आणि प्रिया पुन्हा कोणत्या प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार या प्रतीक्षेत त्यांचे फॅन्स आहेत.