लोकप्रिय मराठी अभिनेता उमेश कामत त्याचा 42वा वाढदिवस साजरा करत आहे. 

मुंबई येथे जन्मलेला उमेश आज मराठी इंडस्ट्रीतील एक नामवंत अभिनेता आहे.

त्याच्या वाढदिवसा निमित्त जाणून घेऊया प्रियासोबतची लव्हस्टोरी

प्रिया-उमेश हे मराठीतील एक क्युट कपल म्हणून ओळखले जातात.

तब्बल सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी संसार थाटला.

मैत्रीनंतर दोघांचे प्रेमात रुपांतर झाले, पण प्रेम व्यक्त कोण करणार यात दोघांची द्विधा मनःस्थिती झाली होती.

अखेर प्रियाने पुढाकार घेत प्रेम व्यक्त केले.

उमेशने होकार देत प्रियाला वाढदिवसादिवशी आयुष्यभराचे गिफ्ट दिले. 

उमेश आणि प्रिया यांच्या वयात तब्बल 8 वर्षाचे अंतर आहे.

 त्याने यावर विचार करण्यासाठी तब्बल सहा वर्षाचा वेळ घेतला.