सासूबाईंना आई नाही तर 'या' नावाने हाक मारतो प्रथमेश!

प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन सध्या चाहत्यांच्या चर्चेचा विषय आहे.
प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन सध्या चाहत्यांच्या चर्चेचा विषय आहे.
एक फोटो शेअर करत दोघांनी 'आमचं ठरलंय' असं म्हणत डेट करत असल्याचा खुलासा केला.
आता प्रथमेश मुग्धाच्या आईला कोणत्या नावाने हाक मारतो हे समोर आलं आहे.
मुग्धाच्या आईच्या वाढदिवसानिमित्त प्रथमेशने एक खास पोस्ट शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
 मुग्धाच्या आईबरोबरचा एक फोटो शेअर करत त्याने 'वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी!!' असं म्हटलं आहे.
यानिमित्ताने प्रथमेश मुग्धाच्या आईला मावशी अशी हाक मारतो हे त्याच्या चाहत्यांना कळलं आहे.
 मुग्धा आणि प्रथमेशच्या नात्याबद्दल कळताच त्यांचे चाहते खूप आनंदी झाले आहेत.
 आता हे दोघं कधी लग्न करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.