सोप्पा नव्हता प्राजक्ताचा आजवरचा प्रवास; म्हणाली अगदी मरेपर्यंत…

प्राजक्ता माळी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आहे.

आज तिने चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

पण तिचा हा प्रवास सोपा नव्हता, तिने नुकतंच याविषयी खुलासा केला आहे.

तिला प्रवासाविषयी विचारलं असता संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्याचा घटक आहे. हे स्वीकारायला हवं, असं प्राजक्ता म्हणाली.

प्राजक्ता मूळ पुण्याची त्यामुळे ती मुंबईत आली तेव्हा तिला आर्थिक संघर्ष करावा लागला.

 त्यावेळी तिने अगदी मुंबई- पुण्याच्या मालगाडीतूनही प्रवास केला आहे.

 मुंबईतील सिनेसृष्टीत तिला चढाओढ, गॉसिप्स, अंतर्गत राजकारण या गोष्टी झेलाव्या लागल्या.

तसंच आता यश मिळवल्यावर आर्थिक पेक्षा मानसिक त्रास जास्त आहे असं मत प्राजक्ताने व्यक्त केलं आहे.

या सगळ्या संघर्षावर मात करत प्राजक्ताने आज यश मिळवलं आहे.