आदिपुरुषसाठी कलाकारांनी घेतलीये दणकून फी!
'आदिपुरुष' हा चित्रपट येत्या 16 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
या चित्रपटासाठी कलाकारांनी भरमसाठ रक्कम आकारली आहे.
आदिपुरुषमध्ये प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत प्रभास दिसणार आहे. रिपोर्टनुसार त्याने तब्बल 150 कोटींची रक्कम आकारली आहे.
सैफ अली खानने रावणाच्या भूमिकेसाठी 12 कोटी रुपये आकारली आहेत.
कृती सेनन हिने सीतेच्या भूमिकेसाठी 2 कोटी रुपये आकारली आहे.
रिपोर्टनुसार सनी सिंगने लक्ष्मणाच्या भूमिकेसाठी 1 कोटी रुपये घेतले आहेत.
अभिनेत्री सोनाली चौहान या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार असून तिने 50 लाख रुपये फी घेतली आहे.
मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेने या सिनेमात हनुमानाची भूमिका साकारली आहे. पण त्याच्या फी बद्दल अजून माहिती समोर आलेली नाही.
'आदिपुरुष' हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक भलतेच उत्सुक आहेत.
तुमसे मिलके दिल का है जो हाल...समृद्धीचा मनमोहक अंदाज!
Heading 3
Click Here