आयपीएस कीर्ती आता दिसणार नव्या रूपात!

'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेतून आयपीएस कीर्ती अर्थातच अभिनेत्री समृद्धी केळकर घराघरात पोहोचली होती.

ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती.

कीर्ती आणि शुभमची जोडी प्रचंड लोकप्रिय ठरली होती.

परंतु काही दिवसांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता.

आता समृद्धीच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज आहे.

अभिनेत्री लवकरच टीव्हीवर कमबॅक करत आहे.

कीर्तीच्या रुपात पाहायला मिळालेली समृद्धी आता सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसून येणार आहे.

समृद्धी केळकर 'मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा' या शोमध्ये झळकणार आहे.

तुम्ही समृद्धीला पुन्हा एकदा टीव्हीवर पाहायला उत्सुक आहात का?