पठाणची बॉक्स ऑफिसवर छप्परतोड कमाई!

आणखी पाहा...!

'पठाण' मधून शाहरुख खानने चार वर्षानंतर पडद्यावर पुनरागमन केलं आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुख आणि दीपिका पादुकोणची केमिस्ट्री पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. 

या चित्रपटाने रिलीज होताच कमाईचे अनेक रेकॉर्ड्स मोडीत काढले आहेत.

पठाण २५ जानेवारीला रिलीज झाला होता. 

आज रिलीजच्या तिसऱ्या दिवशी भारतात पठाणने ३५ ते ३६ कोटींचा गल्ला जमवला आहे. 

तर भारतात एकूण हा आकडा १५० कोटींच्या पार पोहोचला आहे. 

वर्ल्डवाईडबाबत सांगायचं झालं तर चित्रपटाने ३०० कोटींचा टप्पा गाठला आहे. 

शाहरुख खानच्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

हा चित्रपट पुढे काय कमाल करतो पाहणं महत्वाचं ठरणार आहे.