पलक तिवारीवर भाईजान नाराज...?
श्वेता तिवारीची लेक पलकने नुकतंच चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे.
सलमान खानच्या किसी का भाई किसी कि जान या सिनेमात ती झळकली आहे.
काही दिवसांपूर्वी सलमान खान बद्दल एक खुलासा करत पलक चर्चेत आली होती.
सलमान खानने चित्रपटाच्या सेटवर कमी नेकलाइन्स घालणाऱ्या महिलांविरोधात एक नियम बनवला होता, असं ती म्हणाली होती.
पलक तिवारीच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली
तिच्या या बोलण्यावर सलमान नाराज असल्याचेही सांगण्यात आले.
आता अभिनेत्रीने खुलासा केला आहे की तिच्या आणि सलमान खानमध्ये कोणताही वाद झालेला नाही.
एका मुलाखतीती पलक म्हणाली, 'संपूर्ण वादानंतरही सलमानसोबतचे नाते पूर्वीसारखेच आहे.'
ती पुढे म्हणाली, 'मी अजूनही शिकतेय, तुम्ही काही चांगल्या हेतूने बोलता आणि ते चुकीच्या मार्गाने जाते.