ऑस्कर 2023 मध्ये भारताने रचला इतिहास!
ऑस्कर 2023 च्या शानदार सोहळ्याची सगळीकडेच चर्चा होत आहे.
यंदा भारताने यंदा दोन ऑस्कर पटकावले.
RRR च्या 'नाटू नाटू' गाण्याने ऑस्कर जिंकत भारताची मान उंचावली आहे.
आरआरआर सिनेमातील 'नाटू नाटू'या गाण्याने यंदाचा बेस्ट ओरिजिनल साँग कॅटेगिरीत ऑस्कर जिंकला आहे.
नाटू नाटू गाण्याने ऑस्कर जिंकणं ही भारतीय सिनेमासाठी खूप गर्वाची बाब आहे.
ऑस्करमध्ये राम चरण आणि JR एनटीआर यांच्या 'नाटू नाटू' या गाण्यावर खास परफॉर्मन्स सादर करण्यात आला.
यासोबतच भारताच्या 'द एलिफंट व्हिस्पर्स'ला बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
या शॉर्ट फिल्मच्या निर्मात्या गुनीत मोंगा यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
यंदा अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील ऑस्कर 2023 च्या सोहळ्यात सहभागी झाली होती.