बंगाली अभिनेत्री आणि टीएमसी खासदार नुसरत जहाँ मागील काही दिवसांपासून त्यांच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत आहे.

नुसरत जहाँ यांनी 26 ऑगस्टला बाळाला जन्म दिल्यानंतर अनेकांनी त्यांना ट्रोल केलं.

ती अभिनेता यश दासगुप्तासोबतच्या नात्यामुळेही चर्चेत आली आहे.

एका रेडिओ शोमध्ये बोलताना तिने दासगुप्तासोबतच्या नात्यावर खुलासा केला आहे. 

मी तुझ्या प्रेमात पडलो आहे, ही माझी निवड आहे आणि इतर सर्वांना माहित आहे. असे प्रेम नुसरतने यशबद्दल व्यक्त केले. 

नुसरतने यशबद्दल प्रेम व्यक्त केले असले तरी दोघांच्या लग्नबद्दल अद्याप अधिकृत घोषणा नाही.

काही दिवसांपूर्वीच नुसरत आणि यश यांनी मुलाला जन्म दिला. 

काही महिन्यांपूर्वी निखिन जैनसोबतच्या लग्नावरून ती वादात सापडली होती.

19 जून 2019 रोजी नुसरत निखील जैनसोबत विवाहाच्या बंधनात अडकली होती. 

मात्र, लग्नानंतर दोन वर्षांनी नुसरत व निखील यांच्या नात्यात मतभेद निर्माण झालेत. 

इतकंच नाही तर निखीलसोबतचं आपलें लग्न अवैध असल्याचा दावा करून नुसरतने केला होता. 

त्यानंतर, तुर्कीत हे लग्न झाल्यानं टर्किश मॅरिज रेग्युलेशनमध्ये त्याची नोंद झाली. परंतु तुर्कीचा कायदा भारतात मान्य नाही.