अन् नोराने सहकलाकाराच्या कानाखाली लगावली!
लोकप्रिय डान्सर नोरा फतेहीने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
कॅनडाच्या नोराने भारतात तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.
नुकतंच तिनं आयुष्यात घडलेल्या काही विचित्र घटनेविषयी खुलासा केला आहे.
तिच्या एका सहकलाकारानं तिच्याशी जी गैरवर्तणूक केली त्याविषयी तिनं सांगितलं आहे.
नोरा शूटिंगसाठी एका सहकलाकाराबरोबर जंगलात गेली होती तेव्हा त्यानं तिच्यासोबत गैरव्यवहार केला.
तेव्हा त्याला विरोध करत तिने त्याच्या थोबाडीत मारली आणि दोघांत हाणामारी सुरू झाली.
'मारामारी होत असताना त्यानं माझे केस ओढले. त्यानंतर आमच्या प्रचंड मारामारी झाली.' असं नोराने सांगितलं आहे.
नोरानं केलेल्या या हाणामारीचा किस्सा ऐकल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्य वाटत आहे.
नोरा फतेहीने सांगितलेला हा किस्सा आता चांगलाच चर्चेत आहे.