निवेदिता सराफ यांची 'साठी' दणक्यात
अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी 60वा वाढदिवस साजरा केला.
भाग्य दिले तू मला या मालिकेत त्या सध्या काम करत आहेत.
मालिकेच्या सेटवर निवेदिता यांना खास सरप्राइज देण्यात आलं.
त्यांची रुम फोटो आणि लाइटिंगनं सजवण्यात आली होती.
सहकलाकारांनी निवेदिता यांचं दिव्यांनी औक्षण केलं.
सगळ्यांनी निवेदिता यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.
निवेदिता यांच्यासाठी स्पेशल केक मागवण्यात आलेला.
कलाकारांनी खास गिफ्ट देत त्यांना पुन्हा सरप्राइज केलं.
, इतकं प्रेम मिळाल्यावर असं वाटतं..."भाग्य दिले तू मला", असं निवेदिता यांनी म्हटलं.