स्वतःच्याच लग्नात बेभान नाचला 'हा' अभिनेता!
नवे लक्ष्य' फेम अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र लग्नाच्या बेडीत अडकला आहे.
अभिजीतने सेजल वर्देसह लग्नगाठ बांधली आहे.
कुटुंबीय व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत अभिजीत व सेजल यांचा विवाहसोहळा पार पडला.
अभिजीतच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अभिजीतच्या हळदीचे रोमँटिक फोटो समोर आले होते.
आता अभिजीतच्या लग्नाचा एक सुंदर व्हिडीओ समोर आला आहे.
या व्हिडिओत अभिजीत स्वतःच्याच लग्नात दणकून नाचलेला दिसतोय.
अभिजीत आणि सेजलने आपल्या लग्नाचा पुरेपूर आनंद लुटला आहे.
लग्नानंतर चाहते या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.