लांब केस अन् बंगाली वेष; पाहा मायराचा न्यू लूक!

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून परी ही भूमिका साकारणारी बालकलाकार म्हणजेच मायरा वैकुळ.

चिमुकल्या मायराचा सोशल मीडियावर मोठा दबदबा आहे.

या चिमुकलीच्या प्रभावी अभिनयाने भलेभले थक्क होतात.

आता मायरा एका मराठी नाही तर हिंदी मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.

मायरा लवकरच हिंदी मालिकेत झळकणार असून या मालिकेचा प्रोमो नुकताच समोर आला आहे.

या मालिकेचं नाव 'नीरजा एक नई पेहचान' असं असून कलर्स वाहिनीवर लवकरच ही मालिका सुरु होणार आहे.

या मालिकेत मायरा बंगाली मुलीची भूमिका साकारणार आहे.

या मालिकेत मायराच्या लांब केसांमधील न्यू लूक पाहायला मिळणार आहे.

 मायराला या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

सुलोचना- काशिनाथ घाणेकर यांच्यात काय होतं नातं?

Heading 3

Click Here