अजय- अतुल ही मराठीतील आघाडीची संगीतकार जोडी आहे.
अजय अतुल हे संगीत दिग्दर्शानासोबत संगीत संयोजन, पार्श्वसंगीत व पार्श्वगायन देखील करतात.
सावरखेड एक गाव, जोगवा, नटरंग ते महाराष्ट्र शाहीर पर्यंत अजय-अतुल यांनी दर्जेदार गाणी प्रेक्षकांना दिली.
अजय अतुल यांनी संगीताच कोणतंही शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेले नाही.
संगीतात काळानुसार त्यांनी अनेक प्रयोग करण्यास सुरूवात केली आहे प्रेक्षकांची त्याला पसंती मिळाली.
आजवर या संगीतकार भावाच्या जोडीनं अजय-अतुल हे नाव लावून अनेक गाणी संगीतबद्ध केली.
पण अजय-अतुल यांचं नाव पूर्ण नाव काय असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का?
अजय - अतुलचं संपूर्ण नाव हे अजय गोगावले आणि अतुल गोगावले असं आहे.
दोघांमध्ये अतुल गोगावले हा मोठा भाऊ आहे. अतुलचा जन्म 11 सप्टेंबर 1974 सालचा आहे.
तर अजय गोगावले हा धाकटा भाऊ आहे. अजयचा जन्म हा 21 ऑगस्ट 1976 सालचा आहे.