नवीन वर्षाच्या सुरुवातीला शशांकने व्यक्त केली अनोखी इच्छा

शशांक केतकरने आता टीव्हीसोबत मोठ्या पडद्यावर देखील नाव कमावलं आहे.

सध्या तो 'मुरांबा' मालिकेतील अक्षय बनून प्रेक्षकांची मनं जिंकतोय.

शशांक केतकर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो.

तो चाहत्यांसोबत त्याचे फोटो शेअर करत असतो.

तर काही वेळा विविध विषयांवर पोस्ट लिहीत त्याचं मत देखील व्यक्त करत असतो.

आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला शशांकने त्याचे फोटो शेअर करत एक अनोखी इच्छा व्यक्त केली आहे.

या फोटोंमध्ये शशांक एका निसर्गरम्य ठिकाणी निवांत बसलेला दिसतोय.

हे फोटो शेअर करत त्याने लिहिलंय कि, '12 महीने 24 तास अशा शांत वातावरणात जगता आलं पाहिजे.'

 शशांकच्या या पोस्टखाली चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत.