MUKTA BARVE :
'...तरच मी लग्न करेन'
43 वर्षांची अभिनेत्री मुक्ता बर्वे अजूनही अविवाहित आहे.
बहुगुणी अभिनेत्री म्हणून मुक्ताकडे पाहिलं जातं.
नाटक, मालिका, सिनेमा अशा तिन्ही माध्यमांत ती काम करतेय.
मुक्ताचं नाव आजवर अनेक अभिनेत्यांशी जोडलं गेलं आहे.
मुक्ता आणि स्वप्नील जोशी यांची रील लाइफ जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते.
मुक्ताने आजही लग्न का केलं नाही असा प्रश्न तिच्या चाहत्यांना नेहमीच पडला असेल.
पण मुक्ताने कधीच लग्न या विषयावर फारसं भाष्य केलेलं नाही.
एका मुलाखतीत मुक्तानं लग्न या विषयावर मोजक्या शब्दात उत्तर दिलं होतं.
मुक्ता म्हणाली होती, "मी अविवाहीत आहे. पण मी सुखी आहे".
"मी आत्ता जितकी सुखी आणि आनंदी आहे त्यापेक्षा माझा आनंद आणि सुख वाढणार असेल तरच मी लग्न करेन".
मुक्ताचं अभिनेता दिग्दर्शक सतीश राजवाडेवर क्रश होतं, असं तिनं एका मुलाखतीत सांगितलं होतं.
Click Here