मराठमोळी बार्बी दिसतेय फारच क्युट!
मराठीतील बोल्ड अँड ब्युटीफुल अभिनेत्री म्हणजे मिताली मयेकर.
मिताली मयेकरचे फोटो सोशल मीडियावर खळबळ उडवून देतात.
पण सध्या तिचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
सध्या सगळीकडे धुमाकूळ घातलेल्या ‘बार्बी’ चित्रपटाशी मितालीच्या या व्हिडिओचं खास कनेक्शन आहे.
बार्बी स्पेशल गुलाबी रंग डोळ्यापुढे ठेऊन मितालीनं देखील याच रंगाच्या साड्या नेसून एक व्हिडीओ शेअर केलाय.
मितालीचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी हा बार्बीचे भारतीय व्हर्जन असल्याचं म्हटलं आहे.
बार्बीचं हा भारतीय अंदाज नेटकऱ्यांना खूप भावला आहे.
अनेकांनी मितालीच्या या लूकचे कौतुक केलं आहे.
मितालीच्या या व्हिडिओवर सिद्धार्थ चांदेकरने 'बार्बी शोबत लगीन करायचंय…करू दे ना वं' अशी कमेंट केलीये.